ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. पक्षप्रवेशानंतर… Continue reading ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

महायुतीची अंतर्गत मदत महाविकास आघाडीला : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीची अंतर्गत मदत महाविकास आघाडीला झाल्याचा दावा पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी केला आहे.  

चुरशीमुळे मतदानाचा टक्का वाढणार : आ. चंद्रकांत जाधव (व्हिडिओ)

यंदाची पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत असून त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असे आ. चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.  

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर लागू..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र महागाई वाढली आहे. मात्र या काळात डिसेंबर महिन्यात एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. १ डिसेंबरपासून हे नवे दर लागू होत आहेत. जुलै २०२० महिन्यात १४ किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण ४ रुपयांपर्यंत… Continue reading आजपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर लागू..

आम्हीच जिंकणार; पुढील सर्व निवडणुका स्वबळावरच : चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपच विजयी होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त करत यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.  

नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

नागपूर (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज (मंगळवार) महाराष्ट्रातही उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आक्रमक झाली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते… Continue reading नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक

बुलढाणा (प्रतिनिधी) : दिल्ली येथे नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक शेतकरी जखमी झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात आज (मंगळवार) वरवंड (जि.बुलडाणा) येथे स्वाभिमानी शेतकरी घटनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या… Continue reading केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक

दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा-कॉलेजेस बंद असल्या कारणाने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत… Continue reading दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

error: Content is protected !!