कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपकडून धनंजय महाडिक, महेश जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आज (गुरुवार) याबाबतचे पत्र धनंजय महाडिक व महेश जाधव यांना देण्यात आले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या… Continue reading कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपकडून धनंजय महाडिक, महेश जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

नॉन कोविड रुग्णासंबंधी आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सर्व आरोग्य यंत्रणा या महामारीशी लढत आहे. परिणामी नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. आता कोरोना नियंत्रणात आला असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते… Continue reading नॉन कोविड रुग्णासंबंधी आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

वाहनांना फास्टॅग लावण्यास मुदतवाढ..!   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारीपासून टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य केली होती. परंतु आता १५ फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले… Continue reading वाहनांना फास्टॅग लावण्यास मुदतवाढ..!   

कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

समाजसेवा विविध प्रकारे करता येते. त्यासाठी हातात सत्ता असायला हवी असे काही नाही. कोणतीही सत्ता हातात काम नसताना अनेकांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे. कित्येक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सत्तेचा कधीच हव्यास केला नाही. ते जास्तीत जास्त एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. अपवादात्मक एखाद्याला शासनाकडून अनुदान मिळते. सेवाव्रतींंना लोकाश्रय मात्र चांगला मिळतो, असा अनेकांचा… Continue reading कोल्हापुरी ठसका : सर्वांचीच घरे काचेची…

महापालिकेसमोर दिव्यांग सेनेतर्फे लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराविरोधात दिव्यांग सेनेच्या वतीने महापालिकेसमोर आज (गुरुवार)  लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाचा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. यासह दिव्यागांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना दरवर्षी हक्काचा निधी मिळावा, केएमटीमध्ये मोफत बससेवा मिळावी, दिव्यांगाकरता… Continue reading महापालिकेसमोर दिव्यांग सेनेतर्फे लाक्षणिक उपोषण

‘गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  गार्डन्‍स क्‍लब कोल्‍हापूर यांच्‍याकडून दिला जाणारा ‘हरित समृध्‍दी’ पुरस्‍कार गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्‍याबद्दल गोकुळ  संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्ते नरके यांचा सत्‍कार करण्‍यात आला. एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्‍या पदांची जबाबदारी यशस्वीपणे… Continue reading ‘गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

पन्हाळा गडावरील हवेची गुणवत्ता तपासली जाणार  

पन्हाळा (प्रतिनिधी)  : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२१’  व ‘माझी वसुंधरा अभियान’  राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पर्यावरणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी शहरातील हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्यासाठी पन्हाळा शहरातील प्रमुख तीन ठिकाणी महिन्यातून एकदा हवेची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. अशाप्रकारे हवेची गुणवत्ता तपासणी  करणारी  पन्हाळा नगरपरिषद  जिल्ह्यातील  पहिली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व… Continue reading पन्हाळा गडावरील हवेची गुणवत्ता तपासली जाणार  

मरळी येथे अवैध दारूची वाहतूक करणारी ओमणी कार पकडली

कळे  (प्रतिनिधी) :  कोल्हापूरहून बेकायदेशीर देशी दारुची वाहतूक करणारी  ओमणी कार पकडून सुमारे ४८ हजार ४६४ रूपयांची देशी दारू आणि ओमणी कार जप्त करण्यात आली. ही कारवाई मरळी पैकी पोवारवाडी येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कळे पोलिसांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरळी (ता.पन्हाळा)  येथील हॉटेल त्रिदेव बारचे मालक नंदकुमार पांडुरंग पाटील (वय ४३) कोल्हापूरहून… Continue reading मरळी येथे अवैध दारूची वाहतूक करणारी ओमणी कार पकडली

भेटण्यास टाळाटाळ केल्याने प्रेयसीला संपवले

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील सिव्हील हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षक महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. भेटण्यास टाळाटाळ केल्याच्या रागातून प्रियकराने सुरक्षारक्षक असलेल्या प्रेयसीवर तलवारीने सपासप वार करून खून केले. सुधाराणी बसाप्पा हडपद (वय २७, रा. बेळगाव, मूळ रा. मुगबसव, ता. बैलहोंगल) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर  इराण्णा बाबू जगजंपी (वय २४, रा. आश्रय कॉलनी,… Continue reading भेटण्यास टाळाटाळ केल्याने प्रेयसीला संपवले

क्षीरसागर यांनीच वारंवार ‘बावडेकरांमुळे’ आमदार झाल्याचं सांगितलंय..! : मोहन सालपे (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेश क्षीरसागर यांनी अनेकवेळा जाहीर भाषणात आपण बावडेकरांमुळे आमदार झालो असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोण कोणामुळे आमदार झाले, हे कळण्याइतकी जनता सुज्ञ आहे. तर रविकिरण इंगवले यांच्या कर्तृत्वामुळे सीपीआरमधील एक डॉक्टर नुकतेच राजीनामा देऊन गेले आहेत. त्यामुळे इंगवले यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व द्यायची काहीही गरज नाही, असा पलटवार माजी नगरसेवक मोहन सालपे… Continue reading क्षीरसागर यांनीच वारंवार ‘बावडेकरांमुळे’ आमदार झाल्याचं सांगितलंय..! : मोहन सालपे (व्हिडिओ)

error: Content is protected !!