शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत त्यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे. ‘जो शेतकरी… Continue reading शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

केंट क्लब रिसॉर्टमधील चोरीप्रकरणी तिघांना अटक  

टोप (प्रतिनिधी) : सादळे- मादळे (ता.करवीर) येथील केंट क्लब रिसॉर्टमध्ये झालेल्या चोरीचा छडा शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत लावून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर आरोपींनी अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या तीन गुन्हांची कबुली दिली असून यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संकेत राजेंद्र वरगरे (वय२०,… Continue reading केंट क्लब रिसॉर्टमधील चोरीप्रकरणी तिघांना अटक  

शेतकरी आंदोलनास कलाकारांचा पाठिंबा..

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या चार दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी केली आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता,… Continue reading शेतकरी आंदोलनास कलाकारांचा पाठिंबा..

कोल्हापुरातून संग्राम देशमुख यांना मोठी आघाडी : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर भाजपच्यावतीने विक्रमी अशी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना जिल्ह्यातून मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास भाजपच्या कोल्हापूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. पुणे मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित… Continue reading कोल्हापुरातून संग्राम देशमुख यांना मोठी आघाडी : शौमिका महाडिक

बँक, रेल्वे, विमा, गॅससंबंधित नियमांमध्ये १ डिसेंबरपासून बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रास सेटलमेंटच्या (आरटीजीएस) नियमांमध्ये १ डिसेंबरपासून बदल केले आहेत. त्याचबरोबर रेल्वे, विमा, गॅस यासंबंधितही काही नियमांमध्ये बदल करण्यात आले  आहेत. याबाबत जाणून घेऊया… रिझर्व्ह बँकने आरटीजीएसची सेवा २४ तास उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांना फायदा होणार असून इतर व्यवहारांप्रमाणे आता ग्राहकांना कधीही आरटीजीएसच्या माध्यमातून व्यवहार करता… Continue reading बँक, रेल्वे, विमा, गॅससंबंधित नियमांमध्ये १ डिसेंबरपासून बदल

पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मनुग्राफ कंपनीसमोर आज (रविवार) सायंकाळी मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात कर्नाटकातील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिषेक मल्लेशी सोगलाड (वय २५, रा. पुरगुंडूळी ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. सोगलाड हा गवंडीकाम करत असून तो आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथून पारगावकडे जात होता. त्यावेळी मनूग्राफ… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

सातेरी परिसरात डोंगरी भागातील रस्त्यांचा प्रश्न बिकट…

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील सातेरी परिसरातील डोंगरी भागातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची सध्या अवस्था बिकट झाली आहे. अरूंद रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय निधीअभावी दऱ्याखोऱ्यातील नागमोडी वळणाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.   करवीर तालुक्यातील सातेरी-महादेव पर्यटन क्षेत्रातील डोंगरी भागातील वाहतुकीचे रस्ते पावसाळ्यानंतर खराब झाले आहेत. येथे असणाऱ्या नागमोडी वळणांच्या रस्त्याच्या रूंदीकरणाकडे… Continue reading सातेरी परिसरात डोंगरी भागातील रस्त्यांचा प्रश्न बिकट…

गुरुनानक जयंतीनिमित्त उद्या गांधीनगर बाजारपेठ बंद…

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे गुरुनानक जयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते. त्यामुळे उद्या (सोमवार) ) संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ बंद राहणार आहे. असा ठराव सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गुवालदास कट्यार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी सेंट्रल पंचायत, प्रेम प्रकाश मंदिर आणि विविध मंदिरात ग्रंथ पठण, किर्तन, पूजाअर्चा… Continue reading गुरुनानक जयंतीनिमित्त उद्या गांधीनगर बाजारपेठ बंद…

कोल्हापूर जिल्ह्यात आज १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान, दिवसभरात १७ कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तसेच ३८९३ जरांचे कोरोनान अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्या अहवालामध्ये कोल्हापूर शहरातील ३, आजरा तालुक्यातील ३,… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात आज १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

चंद्रकांत पाटलांना रूपाली चाकणकरांचा टोला…

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? अशा शब्दांत टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. स्वप्नातले सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानेच उतरवले आहे. तसे नसते तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावे लागले नसते, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली… Continue reading चंद्रकांत पाटलांना रूपाली चाकणकरांचा टोला…

error: Content is protected !!