राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सन २०२०-२१ या वर्षात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी महिला सक्षमीकरण या विषयावर उत्कृष्ट लेखन केलेल्या इच्छुक आणि पात्र पत्रकारांनी आपले प्रस्ताव ५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालकांनी केले… Continue reading राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारासाठी आवाहन

सीपीआर, आयजीएमचे ऑक्सिजन सिक्युरिटी ऑडीट करण्यासाठी समिती नियुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील ऑक्सिजनमध्ये वाढ करण्यात येणाऱ्या पुरवठा यंत्रणेचे सुरक्षा ऑडीट करण्यासाठी (ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत. समितीस रुग्णालयात बसविण्यात आलेल्या जुन्या आणि नविन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची सुरक्षा तपासणी करणे, ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा जसे की,… Continue reading सीपीआर, आयजीएमचे ऑक्सिजन सिक्युरिटी ऑडीट करण्यासाठी समिती नियुक्त

तळसंदेमध्ये किरकोळ वादातून युवकाचा खून

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे जमिन आणि घराजवळील असणाऱ्या कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. अविनाश भगवान कांबळे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तळंसदे येथील भगवान सहदेव कांबळे आणि शिवाजी रामू कांबळे या चुलत भावांमध्ये जमिनीचा आणि घराशेजारील कुंपणावरून अनेक… Continue reading तळसंदेमध्ये किरकोळ वादातून युवकाचा खून

‘ही’ योजना ठरू शकते कोरोना मृतांच्या कुटुंबास आर्थिक आधार : राहुल चिकोडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग होऊन अनेकांचे मृत्यू होत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. अशा संसर्ग रोगाची लागण होऊन एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक धक्का बसू शकतो. या काळामध्ये असे कुठल्याही कुटुंबावर संकट येऊ नये, अशी आपल्या सर्वांची दृढ भावना आहे. परंतु… Continue reading ‘ही’ योजना ठरू शकते कोरोना मृतांच्या कुटुंबास आर्थिक आधार : राहुल चिकोडे

शासनाने ‘रेमडीसिवीर’ची त्वरीत उपलब्धता करावी : समरजितसिंह घाटगे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाबाधितांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात तुटवडा आहे. शासनाने हे इंजेक्शन रुग्ण संख्येच्या प्रमाणात पुरवठा करावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. येथील उपजिल्हा रूग्णालय कोविड सेंटर आणि कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय भेटीवेळी ते बोलत होते. येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटची… Continue reading शासनाने ‘रेमडीसिवीर’ची त्वरीत उपलब्धता करावी : समरजितसिंह घाटगे

जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोनाचे थैमान असताना एकाच व्यक्तीला दुसऱ्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना ३५ दिवसांपूर्वी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.       आवाडे कुटुंबातील एकूण १८ जणांना याआधी कोरोनाची बाधा झाली होती. पण योग्य त्या खबरदारी नंतर सगळे कोरोनामुक्त… Continue reading जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

गडहिंग्लज (चैतन्य तंबद) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या. मात्र युजीसीने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक राहील असे सांगितले. या सर्व गोंधळात भरडले जात होते ते म्हणजे अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे आदेश दिले… Continue reading अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

ऊर्जामंत्र्यांकडून व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या तक्रारीची दखल घेत २४ तासात बदलले रोहीत्र

मुंबई (प्रतिनिधी) : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे आलेल्या रोहीत्र नादुरस्त असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर डॉ. राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन केवळ २४ तासात नवीन रोहीत्र बसवून गावकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. संगमनेर विभागाच्या आचवी शाखे अंतर्गत येणाऱ्या शिबलापूर गावातील रोहीत्र तांत्रिक बिघाडामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास नादुरस्त पडले. रब्बी… Continue reading ऊर्जामंत्र्यांकडून व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या तक्रारीची दखल घेत २४ तासात बदलले रोहीत्र

कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्वपूर्ण : आदिती तटकरे

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक असून त्यासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क, उद्योग व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज तसेच राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ आदिती तटकरे यांच्या हस्ते माहितीपत्रक आणि मास्क… Continue reading कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी-उद्योजकांचा सहभाग महत्वपूर्ण : आदिती तटकरे

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या (शुक्रवार दि २ ऑक्टोबर) रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.  कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस आणि चिकन विक्रेत्यांनी नोंद घेऊन  दुकाने बंद असणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधीत दुकान मालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 

error: Content is protected !!