‘केडीसीसी’ संचालक मंडळाच्या बैठकीत ‘महत्त्वाचा’ निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात भरलेले चक्रवाढव्याज व नियमित कर्जदारांनी भरलेले सरळव्याज या दोन्ही कर्ज खात्यावरील फरक परताव्यापोटी कर्जदारांना मिळणार आहे. आज (शनिवार) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. या बैठकीत शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच देण्याचा महत्त्वाचा निर्णय बँकेने… Continue reading ‘केडीसीसी’ संचालक मंडळाच्या बैठकीत ‘महत्त्वाचा’ निर्णय

शिरोली पोलिसांकडून मोटारसायकल चोरटा चोवीस तासांत जेरबंद

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी येथील मयुरेश इंजीनियरिंग वर्क्स या कंपनी समोरील पार्किंगमधून मोटारसायकल चोरीस गेली होती. याची नोंद झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात ही चोरी उघडकीस आणण्यात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याने यश मिळवले. याप्रकरणी विशाल विठ्ठल पाटील (वय २३, रा. गुडाळ, ता. राधानगरी) याला रात्री उशिरा अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे. मयुरेश इंजिनिअरिंग… Continue reading शिरोली पोलिसांकडून मोटारसायकल चोरटा चोवीस तासांत जेरबंद

‘एफआरपी’चा निर्णय मान्य, पण ‘ती’ वाढही द्या, अन्यथा… : जालंदर पाटील (व्हिडिओ)

उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य असला तरी ‘ती’ वाढ मिळत नाही, तोवर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटवू न देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.  

ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देणार ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

उसदराबाबत कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.  

पाटबंधारे विभागाने तीन वर्षांच्या कामाचे नियोजन करावे : ना. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाटबंधारे विभागाने कामाच्या नियोजनाचा आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. आज (शनिवार) सिंचन भवनात झालेल्या कुंभी, कासारी आणि कडवी या प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता कामाचे योग्य नियोजन करा, या विभागाची बदनामी होऊ देऊ नका अशा… Continue reading पाटबंधारे विभागाने तीन वर्षांच्या कामाचे नियोजन करावे : ना. सतेज पाटील

…अन्यथा ‘गोडसाखर’चं भवितव्य अंधूक..! : ना. हसन मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कारखान्याची मशिनरी खूपच जुनी झाली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने धाडसी निर्णय घेऊन हा प्लँट बदलताना रोज ५००० टन गाळप क्षमता, को-जनरेशन आणि डिस्टीलरी असा सक्षम प्लँट उभा करावा, अन्यथा या कारखान्याचे भवितव्य अंधूक असेल, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा… Continue reading …अन्यथा ‘गोडसाखर’चं भवितव्य अंधूक..! : ना. हसन मुश्रीफ

गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करावे, रायगड विकास प्राधिकरणाला गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करावे, या मागण्यांचे निवेदन खा. छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज (शनिवार) दिले. मुख्यमंत्री सावंत या दोन्ही मागण्या मान्य करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.… Continue reading गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

जिल्ह्यात दिवसभरात ५० जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ७१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८२२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात ५० जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हऴदीमध्ये भरला आठवडी बाजार

कोथळी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या हऴदी येथील आठवडी बाजार कोरोनामुळे ७ महिने बंद होता. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्यामुळे तसेच जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी झाल्यामुळे हा आठवडी बाजार तब्बल महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठे व्यापारी तसेच नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद… Continue reading सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हऴदीमध्ये भरला आठवडी बाजार

जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आली असून नमूद केलेली प्रतिबंधित /बंद क्षेत्रे व सूट / वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत असल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज (शनिवार) दिला. जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी /क्षेत्र पूर्ववत सुरू… Continue reading जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत वाढली…

error: Content is protected !!