रांगोळी (प्रतिनिधी) : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि हातकणंगले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २ हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आले. हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सुनील हासुरे, आरोग्य सहाय्यक डी. आर. मोराळ, गावकामगार तलाठी पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश गिरी, डॉ. प्राजक्ता जाधव, श्रीमती प्रतीक्षा गारडी, प्रमोद माने, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सागर पोवार, मनोज ऐनापुरे, सचिन कांबळे यांच्यासह आरोग्य सेवक महेश वडर, आरोग्यसेविका भाग्यश्री सलगर, आरोग्य सेवक, सेविका, कोतवाल, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी एकूण ८ ग्रुप तयार केले. प्रत्येक ग्रुपला ३०० प्रमाणे चाचणी करण्याचे उद्दिष्ट्य दिले होते .

नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रभागातील घराघरात जाऊन प्रत्यक्षात १९०० जणांचे चाचण्या करण्यात आले. सध्या गावात कोरोनाचे रुग्ण अल्प प्रमाणात असून लवकरच रेंदाळ गाव कोरोनामुक्त होईल, असा विश्वास सरपंच विजय माळी यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी महालक्ष्मी दूध डेअरी, दत्त दूध डेअरीचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सर्व सदस्य, पदाधिकारी, नागरिक यांचे विशेष सहकार्य लाभले.