जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली :  राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्ग

0
47

कोल्हापूर (प्रतिनिधी): राधानगरी धरणात २३३.४० दलघमी पाणीसाठा असून आज (मंगळवार) राधानगरी धरणातून १४०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली आहेत.

यामध्ये शिंगणापूर, राजाराम बंधारा, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ,  हळदी, खडक कोगे, चिंचोली, माणगाव, खोची, दानोळी, यवलूज, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे, दत्तवाड, बाचणी, सुळकुड, सिद्धनेर्ली असे एकूण २० बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी- ८६.१८ दलघमी, वारणा- ८४२.८३, दूधगंगा – ५९२.०३, कासारी-५८.०८, कडवी– ७१.२४, कुंभी- ६१.०९, पाटगाव-९६.१२, चिकोत्रा- ३९.३४, चित्री-५३,४१ (पूर्ण क्षमतेने भरला आहे),  जंगमहट्टी- ३४.८५, घटप्रभा- ४४.१७,  जांबरे-२३.२३, आंबेआहोळ- ३०.९८ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे- राजाराम २३.७ फूट, सुर्वे २५, रुई ५७.६, इचलकरंजी ५८.४, तेरवाड ५६.६, शिरोळ ५६.३ तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची ५५.८ फूट इतकी पाणी पातळी आहे.