जिल्ह्यात दिवसभरात २० जण कोरोनामुक्त…

0
165

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४०५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये कोल्हापूर शहर – ९, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूरातील राजेंद्रनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,५८९.

डिस्चार्ज – ४७,८३०.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ४९.

मृत्यू – १,७१०.