कागलनजीक दोघांकडून २ किलो गांजा जप्त

0
78

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल-मुरगूड रस्त्यावरील शाहू साखर कारखान्यानजीक शेती कार्यालयाजवळ गांजा विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून २ किलो गांजा व इतर साहित्य असा मिळून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार विजय गुरखे व पोलीस महेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुराव केसरे, सचिन देसाई, महेश गवळी, दीपक घोरपडे, सोम्राज पाटील, वैभव पाटील, सुरज चव्हाण, अनिल जाधव, सुकुमार हासुरकर यांनी सापळा लावून शुभम तानाजी सनगर (वय १९, रा. बेह्गर वसाहत, कागल) आणि अमोल मारुती शिंदे-वड्ड (वय २२, रा. माळभाग, कागल) यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा २ किलो गांजा आणि २० हजार रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.