इचलकरंजीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात २ मुले जखमी…

0
18

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील जवाहरनगरमधील दोन लहान मुलांवर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून जखमी केले. अरफान बागवान (वय २), आदित्य शिरगावे (६, दोघे रा. जवाहरनगर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे असून या दोन्ही जखमी बालकांना आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अरफान व आदित्य हे दोघेही घरासमोर खेळत होते. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यामुळे दोन्ही मुलांनी भेदरून आरडाओरडा केला. ते ऐकून घरातील मंडळी व भागातील नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली. या कुत्र्याने बालकांच्या छाती, हातावर व मांडीवर जबरी चावा घेऊन जखमी केले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याने काही काळ जवाहरनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.