चोरट्याकडून दागिन्यांसह २.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
271

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिये परिसरातील रामनगर येथे सापळा लावून अटक केली. किशन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभारभाटे (वय २७ रा.गांधीनगर कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

या चोरट्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन एलईडी टीव्ही, दुचाकी असा २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे ५ व गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे २ असे सात घरफोडी आणि दुचाकी चोरी एक असे ८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, वसंत पिंगळे, महेश गवळी, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, संदीप कुंभार,सागर कांडगावे, संदीप कुंभार यांच्यासह पथकाने केली.