जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली, तर ‘राधानगरी’तून २८२८ क्युसेकने विसर्ग…

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३२.८० दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी ४ च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० तर सिंचन विमोचकातून १४२८ असा एकुण २८२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड व सिद्धनेर्ली, असे एकूण १९ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-232.80, तुळशी -91.43, वारणा -875.86, दूधगंगा – 627.91, कासारी- 61.25, कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-63.14, पाटगाव 98.59, चिकोत्रा- 40.97, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.65 (पूर्ण क्षमतेने भरला), घटप्रभा –  44.17 (पूर्ण क्षमतेने भरला),  जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ – 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 24.8 फूट, सुर्वे 24.6, रुई 54.9, इचलकरंजी 52.6, तेरवाड 47, शिरोळ 40.9, नृसिंहवाडी – 41 फूट.