जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

0
962

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत एकूण १,८५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) १,३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तब्बल ९,३२९ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ५४६, आजरा ७३, भुदरगड ३८, चंदगड ४१, गडहिंग्लज ५९, गगनबावडा १२, हातकणंगले २३८, कागल ५८,  करवीर ३१८, पन्हाळा १०६, राधानगरी ६९, शाहूवाडी ४२, शिरोळ -७६, नगरपरिषद क्षेत्र १५४,  इतर जिल्हा व राज्यातील- २५ अशा १४९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ३०, १४७

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, १३, ५५२

मृतांची संख्या – ४,०९५,

उपचार सुरू असलेले रुग्ण – १२, ५००