आटपाडीत भिंतीला बोगदा पाडून १८ लाखांचे दागिने लंपास

0
82

सांगली (प्रतिनिधी) : सराफ दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून सुमारे १८ लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये घडली. चित्रपटातील दृश्याला साजेशा या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आटपाडीच्या दिघंची येथील विटा-मायणी रोडवरील विटा मर्चंट बँकेसमोर असणाऱ्या आदिती ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात ही जबरी चोरी झाली आहे. दुकानाच्या मागील बाजूला असणारी भिंत तोडून बोगदा पाडून चोरटे दुकानात शिरले. आणि दुकानातील सोन्या -चांदीचे दागिने लंपास केले. यात २३२ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच साडे पंधरा किलो चांदीचे दागिने आणि रोख ७० हजार असा एकूण १८ लाख ३६ हजार १८८ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.