मुंबई (प्रतिनिधी) :  अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी १८ कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल खळबळ माजवली आहे.

आर्यन खानचे प्रकरण दाबण्यासाठी १८ कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. केपी गोसावीच्या सांगण्यावरून साईलने ५० लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा केला आहे. या ५०  लाखांतले ३८ लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला आहे.

एवढंच नाही तर क्रुझवरील छापेमारीनंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी, केपी गोसावी आणि सॅम डीसोझा यांच्यात  निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये १५ मिनिटं चर्चा झाल्याचा दावा प्रभाकरने केला आहे. परंतु, साईलचे हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत.