कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात या वर्षीचा महापूराने थैमान घातले होते. यामध्ये अनेक गावांना स्थलांतरित व्हावं लागले होते. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावचाही समावेश होता. परंतु, या गावाने आम्हाला शासनस्तरावर कोणतीही मदत नको. पण आमचं पुनर्वसन करा अशी भूमिका घेतली आहे. यासाठी आंदोलनेही करण्यात आली. निलेवाडी गाव वारणा समूहाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने गावातील शिष्टमंडळाने आ. विनय कोरे यांची भेट घेऊन शासन दरबारी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती.

त्यानुसार आ. विनय कोरे यांनी, आंबील टेकावर असलेली वारणा समूहाची १८ एकर जागा निलेवाडी गावच्या पुनर्वसनासाठी देण्याचे कबूल केले. तसेच ही भेट निलेवाडी गावच्या माताभगिंनीना रक्षाबंधनाची ओवाळणी असल्याचं त्यांनी सांगितले.  निलेवाडी येथे झालेल्या जाहीर समारंभात  त्यांनी याबाबतची घोषणा केली.

यावेळी जि.प. सदस्य अशोकराव माने, प्रदीप देशमुख, रवींद्र जाधव बाबासो माने, ग्रामस्थ उपस्थित होते.