कोल्हापूर (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई-मेन्स- २०२२ पाया अंतिम निकाल झाला असून, या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या चार्ट क्लासेस, चाटे आयआयटी- नीट सेंटर ज्युनियर कॉलेजचे १७३ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील निकषानुसार समूहाच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे, असे प्रतिपादन शिक्षको संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले.

प्रा. डॉ. खराटे म्हणाले, देशातील आयआयटी, एनआयटी, आयआयटीसीएफटीआय, एसटीआय अनुदानित अभियांत्रिकी कॉलेजमधील सर्व प्रवेश ई-मेन्स आणि डान्स या परीक्षांच्या आधारे पूर्ण होतात. यावर्षी जेईई मेन्ससाठी एकूण दोन परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळाला होता. या दोन परीक्षांमधून सर्वोत्तम गुणांचा विचार जेईईच्या पात्रतेसाठी करण्यात आला. या परीक्षेमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा २८ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिक माहिती चाटे शिक्षण समूहाच्या शाखेवर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन चाटे व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

‘जेईई- अॅडव्हान्स २०२२’ साठी पात्र ठरलेले चाटे समूहाचे गुणवंत विद्यार्थी

ओम पाटील ९९.७४ (एनटीए स्कोर) आदिती घाडगे (९८.३९ एन स्कोर) मानसी पाटील (९८.०४ एन स्कोर) अधिकेत शिंदे (९७.८५ एनटीए स्कोर) स्वरूप पाटील (९७.२८ एनटीए स्कोर), संकेत पाटील (९७.०७ एनटीए स्कोर), अभिषेक पाटील (९६.८४ एनटीए स्कोर), ओम भेंडे (९६.८२ एनटीए स्कोर) सई मोहिते (९६.७६ एनटीए स्कोर), ऋषीकेश पाटील (९६.७४ एनटीए स्कोर), हिमांशू साबळे (१६६३ एनटीए कोर) विघ्नेश पाटील (९६.६३ एनटीए स्कोर), अथर्व शिंदे (९६.३७ एनटीए स्कोर), सुजल पोवार (९६.०० एनटीए स्कोर), प्रीती देसाई (९५.९० एन स्कोर), धीरज सपाटे (९५.७९ एनटीए स्कोर), अरविंद लोहार (९५.६३ एनटीए स्कोर), साहिल सेटे (१४.६७ एनटीए स्कोर), दक्ष लोहिया (९४.३३ एनटीए स्कोर),

चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.