इचलकरंजीजवळ बेकायदेशीर १६ लाख ५२ हजारांचा सुंगधी तंबाखू जप्त…

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजीजवळ १६ लाख ५२ हजारांचा सुगंधी पान मसाला, सुगंधी तंबाखू बोलोरो पिकअप वाहनातून बेकायदेशीर नेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला. याप्रकरणी तुषार तुकाराम खंडाळे (वय १९, रा. महेश सोसायटी, इंदिरानगर पोलीस स्टेशन जवळ, पुणे), राजूराम पिराराम बिष्णोई (वय ३२, सध्या रा. बीबवेवाडी, पुणे, मुळ रा. पादू, ता. शिवाना बाडमेर, राजस्थान) आणि आनंद बापू साळवे (वय ३५, रा. आंबेडकरनगर, साईबाबा मंदिर जवळ, मार्केट यार्ड, पुणे) या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमंलदार नितीन चोथे यांना गोपनीय माहितीनुसार बोरगाव ते इचलकरंजी रोडवर अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होीत. या माहितीनुसार  पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अधिकारी शेष मोरे, पोलीस अमंलदार अनिल पास्ते, अमोल कोळेकर, संदिप कुंभार, रफिक आवळकर, रणजित पाटील, संजय इंगवले, ओंकार परब यांनी  बोरगाव ते इचलकरंजी रोडवरील स्मशानभूमीजवळ सापळा रचला.

यावेळी बोलोरे पिकअप (एमएच १२ केपी ९८६९) या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये सुंगधी तंबाखू, पानमसाला आढळून आला. यावेळी पोलीसांनी बलोरो गाडी, तीन मोबाईल आणि तंबाखू असा १६ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करत तीघांना अटक केली.