कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्बंध लागू असूनही कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस तासांत एकूण १५७७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) १४६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४२९, आजरा-७९, भुदरगड-५०, चंदगड-३५, गडहिंग्लज-३०, गगनबावडा-५, हातकणंगले-१५४, कागल-५२,  करवीर-३७१, पन्हाळा-९०, राधानगरी-३६, शाहूवाडी-४, शिरोळ-११०, नगरपरिषद क्षेत्र-११६, इतर जिल्हा व राज्यातील-४६ अशा १५७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ३१, ७२४, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, १५, ०२०, मृतांची संख्या – ४,१३५, उपचार सुरू असलेले रुग्ण – १२, ५६९