कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते ऋतुराज श्रीरसागर यांच्या संकल्पनेतून ४ डिसेंबर २००७ नो मर्सी ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपचा १४ वा वर्धापन दिन आज कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, ग्रुपचे अध्यक्ष रोहन घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

युवकांचे संघटन करून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवून सामाजिक आणि विधायक कार्यासाठी नो मर्सी ग्रुप नेहमी अग्रेसर राहीला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, हिवाळ्यामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना चादरीचे वाटप, जनावरांना चारा वाटप, शहरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २०१४ साली या ग्रुपच्या संघटनात्मक झालेल्या फेररचनेमध्ये अध्यक्ष म्हणून रोहन घोरपडे आणि उपाध्यक्ष म्हणून हर्ष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ काळात गरीब व गरजू नागरिकांना भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू मदत वाटपात सहकार्य करणे,कोविड १९ रुग्णांना रेमिडीसिवीरची कमतरता भासल्यास त्याची उपलब्धता करून देणे,कोविड १९  काळात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करणे,विशेषत २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापूर शहरावर ओढविलेल्या अस्मानी महापूर संकटामध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात नो मर्सी ग्रुपचा मोठा वाटा आहे.

या १४ व्या वर्धापनदिनी शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवा नेते पुष्कराज क्षीरसागर आणि ग्रुपचे अध्यक्ष रोहन घोरपडे यांनी नूतन उपाध्यक्ष शुभम घोरपडे यांचा सत्कार केला. यावेळी ओमिक्रोन या नवीन कोविड १९ विषाणूचा संसर्ग कोल्हापूरवर ओढवू नये. यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत, सामाजिक सुरक्षित अंतर राखावे आणि लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, असे ग्रुपच्या वतीने आवाहन केले.