जिल्ह्यात दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त…

0
189

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९९३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर ९, करवीर तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना रुग्ण ४९,४८०.

डिस्चार्ज – ४७,७०७.

उपचारासाठी दाखल – ७३.

मृत्यू – १७००.