डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत आज १३५८ घरांची तपासणी

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरु केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत आज (मंगळवार) ९ प्रभागातील १३५८ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २३९३ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ९५ ठिकाणी डेंग्यूच्या अळया आढळून आल्या असून, त्या टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या.

शहरातील प्रभाग क्र. ४२, २७, ४७, ३५, ५७, ६७, ५१, १३ आणि २३ या  ९ प्रभागात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत राबविण्यात आली असून, १३५८ घरांची तपासणी केली. घरातील कंटेनर यामध्ये फ्रीज, बॅरेल, सिंटेक्स टाक्या, कुंडया, टायर आदी २३९३ बाबींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९५ ठिकाणी डेंग्यूच्या अळया आढळून आल्या. त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध आणि धूर फवारणीवरही भर देण्यात आला आहे.

यापुढेही ही मोहिम अधिक गतीमान केली जाणार असून, डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी आणि धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम तसेच शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे, जेणेकरून डेंग्यू, चिकनगुनियावर नियंत्रण ठेवता येईल, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.