कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरु केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात ९ प्रभागातील १२६७ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १९४८ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ८५ ठिकाणी डेंग्युच्या आळया आढळून आल्या असून त्या टेमीफॉस हे द्रावन टाकून नष्ट करण्यात आल्या.

शहरातील प्रभाग क्र.८१,६८,६४,२६,६०,५०,३४ आणि ५६ या ९ प्रभागात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेत राबविण्यात आली असून १२६७ घरांची तपासणी केली. यावेळी घरातील फ्रीज, बॅरेल, सिंटेक्स टाक्या, कुंडया, टायर आदि १९४८ बाबींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८५ ठिकाणी डेंग्यूच्या आळया आढळून आल्या असून त्या औषध टाकून नष्ट करण्यात आल्या. तसेच औषध आणि धूराची फवारणीवरही भर देण्यात आला आहे.