कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १२२ जणांना लागण

0
340

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढतच आहे. आज (गुरुवार) गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून दिवसभरात ५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १,४१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४५, आजरा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ९, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १६, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३१ आणि इतर जिल्ह्यातील १३ अशा १२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५२,१८२.

डिस्चार्ज – ४९,५६६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ८४४.

मृत्यू – १,७७२.