जेईईच्या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे १२ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र…

0
56

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयआयटीमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई (अ‍ॅडव्हान्स)’ २०२० या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला. चाटे शिक्षण समुहाच्या ज्युनिअर कॉलेज, क्लासेस, आयआयटी-नीट सेंटरच्या कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा जेईई (अ‍ॅडव्हान्स) परीक्षेतही कायम राखली आहे.

या प्रवेश परीक्षेत समुहाच्या एकुण १२ विद्यार्थ्यांनी जेईई (अ‍ॅडव्हान्स) परीक्षा पात्र करून आपला आयआयटीतील प्रवेश निश्चित केला आहे.चाटे क्लासेस, चाटे कॉलेज व आयआयटी-नीट अकॅडमी याठिकाणी या परीक्षांसाठी राबविण्यात आलेल्या चाटे पॅटर्नचा फायदा झाल्याचे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले.

जेईई-(अ‍ॅडव्हान्स) २०२० च्या परीक्षेत यशस्वी होऊन देशपातळीवरील विविध आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी यशस्वी झालेले चाटे शिक्षण समुहाचे विशेष गुणवंत विद्यार्थी असे – श्रुतिका पाटील, सौरभ हंजे, वैष्णवी फराकटे, अनुरूप शेण्वी, रोहिनी घाटगे, सौरभ जोग, विनय नेरकर, निनाद कांचन, यश धनसरे, तनया सोनकुळ, हर्षल होळकर, चैत्राली कुलकर्णी यांना प्रा. डॉ. भारत खराटे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले की, अकरावी आणि बारावी सायन्समध्ये प्रवेश घेवून करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आम्ही चाटे ज्यु. कॉलेजच्या इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि चाटे क्लासेसच्या माध्यमातून कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धतीमुळे आमच्याकडे अकरावी-बारावीमध्ये प्रवेश घेऊन आयआयटी, जेईई (मेन आणि अ‍ॅडव्हान्स), नीट अशा इतर स्पर्धापरीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्यास मदत होईल.

यावेळी चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा.मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, संचालक, कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here