दोन सराईत चोरट्यांकडून १२ मोटारसायकली जप्त

0
115

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलिसांनी आज (मंगळवार) दोघा अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक केली. गणेश सुरेश आसगावकर (वय २१, मूळ रा. मंगळवार पेठ, सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत) व शोएब बाबासाहेब मालदार (३०, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्याची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पावणेचार लाखांच्या १२ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

एक सराईत गुन्हेगार चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी लक्षतीर्थ वसाहत रोडवर येणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांना या ठिकाणी एक संशयित तरुण आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आपल्या मित्राच्या मदतीने मोटरसायकल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. या दोघांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठ, तसेच लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन अशा १२ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.