जिल्ह्यात १२ जणांना कोरोनाची लागण : एकाचा मृत्यू

0
157

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासात १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ अशा बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीमधील गुरुवार पेठ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,७८०.

डिस्चार्ज – ४७,९६५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १०२.

मृत्यू – १७१३.