Published October 14, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ११० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४७७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७.५० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३३, आजरा तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील ९, कागल तालुक्यातील ५,  करवीर तालुक्यातील ९, पन्हाळा तालुक्यातील ४, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ८, शिरोळ तालुक्यातील ४ इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील १६ अशा एकूण ११० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर शहरातील १, आजरा तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील २, इचलकरंजी परिसरातील २, हातकणंगले तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, अशा तब्बल ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४७,०५८.

एकूण डिस्चार्ज : ४१,७५७.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ३७२४.

एकूण मृत्यू : १५७७.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023