अनुसुचित जाती प्रवर्गासाठी शहरातील ११ प्रभाग आरक्षित  

0
1101

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) सकाळी ११ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात  आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली. एकूण ११ प्रभागांपैकी ५ प्रभाग पुरूषांसाठी तर ६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. दरम्यान, नाट्यगृह परिसरात इच्छुक उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) आरक्षित प्रभाग खालीलप्रमाणे  

प्रभाग क्रमांक ३० (खोलखंडोबा), प्रभाग क्रमांक ६७ (रामानंदनगर-जरगनगर), प्रभाग क्रमांक ७५ (आपटेनगर-तुळजाभवानी), प्रभाग क्रमांक ४० (दौलतनगर), प्रभाग क्रमांक १६ (शिवाजी पार्क), प्रभाग क्रमांक १९ (मुक्तसैनिक वसाहत).

अनुसुचित जाती प्रवर्ग (पुरूष) आरक्षित प्रभाग खालीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक ७ (सर्किट हाऊस), प्रभाग क्रमांक ८ (भोसलेवाडी- कदमवाडी), प्रभाग क्रमांक २० (राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड), प्रभाग क्रमांक ६२ (बुध्द गार्डन), प्रभाग क्रमांक ७९ (सुर्वेनगर)