कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,०६६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (रविवार) ,४६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २४४ आजरा- १६, भुदरगड- ३०, चंदगड- १०, गडहिंग्लज- २६, गगनबावडा- २, हातकणंगले-१५४, कागल – ३८करवीर – १७५, पन्हाळा – ६५, राधानगरी- ३८, शाहूवाडी – ०९, शिरोळ- ६५, नगरपरिषद क्षेत्र ९४,  इतर जिल्हा व राज्यातील- २२ अशा १,०६६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ४१, ६६०

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , २६, ८६१

आजअखेर मृत्यू ,४१३

उपचार सुरु असलेले रुग्ण १०,१८६