अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणास १० वर्षे सक्तमजुरी

0
38

इचलकरंजी (प्रतिनिधी) : बीअर देण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयाने लाटकर दहा वर्षे सक्तमजुरी आणि ६१ हजारांचा दंड अशी सजा सुनावली. तोहिम अमीन लाटकर (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार २०१६ साली घडला होता.

या प्रकरणी लाटकर याच्यावर इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. शेळके यांनी यातील संशयित लाटकर याला दोषी ठरवून दहा वर्षांची सक्तमजुरी व ६१ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एच. आर. सावंत – भोसले यांनी काम पाहिले.