पैजारवाडी येथे ट्रक-एससटीच्या अपघातात १० जण जखमी…

0
49

बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर चिले महाराज समाधी मंदिर जवळील राष्ट्रीय मार्गावर एसटी, ट्रक आणि स्विप्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटी चालकासह दहाजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सकाळच्या सुमारास बेळगावहून विशाळगडकडे चाललेल्या एमएच-१४ बीटी-२७९९ या बसला समोरून आलेल्या एमएच ०९ सीयू ६६६७ या क्रमांकाच्या ट्रकने  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने एसटी चालकासह दहाजण जखमी झाले. तर एसटीच्या मागे असणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने पाठीमागून धडक दिल्याने या गाडीचे मोठे नुकसान झाले. रस्त्याच्या बाजूला खोलगट भाग असलेने प्रसंगावधान राखून बसने नियंत्रण मिळवल्याने मोठी जिवितहानी टळली. अन्यथा सुमारे वीस फूट खड्ड्यामध्ये एसटी पलटी होऊन जिवितहानी झाली असती. धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे पैजारवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना सुखरूप बाहेर काढले.

या अपघातातील जखमींची नावे अशी की, लाखवा भिमाप्पा (वय ६० रा. बगरकेटे,कर्नाटक), संभाजी शंकर कुंभार (वय ४३), शुभांगी संभाजी  कुंभार (वय ४२), बेबी शंकर कुंभार (वय ६० तिघेही रा. पनवेल ,मुंबई), रिहान इमामनगर (वय २२ रा.भाषानगर), सय्यद रफी उल्ला (वय ६६, रा. बंगरूळू ,कर्नाटक) असून जखमींवर बोरपाडळे प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये उपचार करुन सोडण्यात आले.