पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी ३ मे ते १२ मे या कालवधीत पूर्णपणे १० दिवसांसाठी पन्हाळा बंद केला आहे.   

पन्हाळा शहरामध्ये एप्रिल महिन्यांपासून कोरोनाचे ५० रुग्ण सापडले आहेत. त्यातील १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तहसिलदार रमेश शेंडगे यांचे आदेशानुसार मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी पन्हाळा दहा दिवसांसाठी पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये किराणा, भाजीपाला, फळे, कृषी, पशुखाद्यासहीत आदी दुकानांना  फक्त घरपोच सुविधा देता येणार आहे. दूधाची विक्री रोज सकाळी ७ ते सकाळी ९ अशी सुरु राहणार आहे. तर इतर सर्व खासगी आस्थापना, व्यवसायांची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच मेडिकल दुकाने, वैद्यकीय सुविधा, लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.