कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे २३ ते २६ डिसेंबर या चार दिवसाच्या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसात प्रदर्शनाच्या माध्यमातून १० कोटींची उलाढाल ही झाली आहे. शिवाय महिलांना दिलेल्या मोफत बचत गटामधूनही जवळजवळ २० लाखांची उलाढाल झाल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

यावेळी या प्रदर्शनात घेण्यात आलेल्या ऊस,फळ, पशु-पक्षी आणि जनावरे या विभागात घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

आ. सतेज पाटील यांनी, या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश घेतला होता. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली घेता आली. या चार दिवसात प्रदर्शनाच्या माध्यमातून १० कोटींची उलाढाल झाल्याचे ते म्हणाले.

यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत यांनी या नियोजन केले होते.