राज्यातील पुरग्रस्तांना सय्यद चँरिटेबल ट्रस्टकडून १० कोटी देणार : दिपाली सय्यद

0
224

गारगोटी (प्रतिनिधी) : खरेच मी पाहाणी करताना ही पुरग्रस्तांची विदारक स्थीती पाहून माझे ह्रदय रडत होते. मावशी आता रडू नका. मी आता आलेय. नक्कीच कोणी दु:खी होणार नाही. काळजी करू नका. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हासू असेल. सर्व काही निट होणार आहे. यासाठी संयम बाळगा असे सांगत अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांनी शेणगांव (ता.भुदरगड) येथील पाहाणी करत पुरग्रस्त ग्रामस्थांचे आसू पुसले. राज्यातील पूरग्रस्तांना सय्यद चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने १० कोटी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

शेणगांव ता. भुदरगड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दुपारी संप्पन्न झालेल्या या कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद पुढे म्हणाल़्या की, आपण कोरोनाला जसे हरवले तसे या महापुराच्या समस्येला हरवणार आहोत. यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देवूया. सर्वांनी चांगल्या पध्दतीने पु्र्ववत शेणगांव उभ करूया. यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की, अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी पुरग्रस्त शेणगांवला भेट देवून गावच्या लोकांना मदतीचा जो धीर दिला आहे तो फार मोठा आहे. गावचे सरपंच सुरेशराव नाईक म्हणाले की, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी अत्यंत आस्थापुर्वक पुरग्रस्त शेणगांव गावाला भेट देवून जिव्हाळ्याने पुरग्रस्त परिस्थीतीची पाहाणी केली. पुरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या आणि मदतीचे आश्वासन दिले याबद्दल गावच्या वतीने त्यांचे आभार मानले.