मुंबई (प्रतिनिधी) : येत्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये आखणी वाढ होण्याची शक्यता आहे. एका एलपीजी सिलेंडरसाठी १  हजार रुपये मोजावे लागू शकतात. तसेच सिलेंडरवर मिळणारे अनुदानही रद्द होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता  आहे. मात्र,  यासंबंधी अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.  

दरम्यान,  केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी १ हजार पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही. किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत  नाही. आर्थिक वर्ष २०२०-२१ मधअये सरकारने अनुदान म्हणून ग्राहकांना ३५५९ कोटी रुपये दिले होते. २०१९-२० मध्ये खर्चाचा हा आकडा २४ कोटी ४६८ इतका होता. म्हणजेच सरकारने एका वर्षात अनुदानामध्ये ६ पटीने कपात केली आहे.