मंगळवार पेठ परिसरातून १ लाख रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल

0
74

‍कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर शहरातील बजापराव माने तालीम परिसर, हैदर रोड, शिंदे गल्ली, डाकवे गल्ली, शाहू बँक तसेच मंगळवार पेठ परिसरातील महापालिकेच्या पाणी पुरवठा वसुली पथक क्रं. ४ यांनी काल (बुधवार) १ लाख ५ हजार ६९१ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले असल्याची माहिती, पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल यांनी दिली.

याबरोबरच थकीत पाणी बिलासाठी या पथकाने या परिसरातील थकबाकीदारांची ९ पाणी कनेक्शन बंद केली आहेत. ही कारवाई पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल, मिटर रिडर रणजित संकपाळ, उमेश साळोखे, संदीप सरनाईक, साताप्पा जाधवआणि विनायक फिटर यांनी केली.