कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शनिवार) कोव्हिशिल्ड लसीचे १ लाख डोस उपलब्ध झाले असून लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ लाख डोसपैकी  कोल्हापूर महापालिका १७,२००, आजरा तालुक्यात २,६९०, भुदरगड ३,२९०, चंदगड ४,९५०, गडहिंग्लज ५,७५०,  गगनबावडा ५५०, हातकणंगले २० हजार, कागल ६,८८०, करवीर १२,३००, पन्हाळा ६,४९०, राधानगरी ४,६९०, शाहूवाडी ४,२५० आणि शिरोळ तालुक्यासाठी १०,९६० असे  डोस उपलब्ध झाले आहेत.