मनपा शाळा स्वच्छता अभियानास सुरुवात…

0 14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ५९ मनपाच्या शाळांचे अंतर्गत स्वच्छता अभियान कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व प्राथमिक शिक्षण समिती यांच्या मार्फत आज (सोमवार) करण्यात आली. ही स्वच्छता अभियान मोहीम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या माध्यमातून घेतली जात आहे.

आज संभाजीनगर विद्यालय शाळा क्रमांक तीस येथून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम मनपा शाळेतील सर्व शिक्षक, सेवक, वॉचमन व परिसरातील नागरिक यांच्या सहकार्यातून राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

प्रशासनाधिकारी शंकर केशव यादव, शैक्षणिक परीक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, कनिष्ठ लिपिक अजय गोसावी, शांताराम सुतार, मुख्याध्यापिका शकुंतला मोरे, मनपा शाळेतील तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक, शिक्षक आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More