संजय राऊत प्रभारी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी…

0 14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रभारी म्हणून संजय राऊत यांनी पदभार स्विकारला. प्रादेशिक परिवहन विभागाचा अतिरिक्त पदभार असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची पुणे येथे बदली झाली आहे. या जागेचा पदभार साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संजय राऊत हे १९८३ साली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते जळगाव येथून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी मोटार वाहन निरीक्षक पदावर नागपूर, पुणे, सांगली, कोल्हापूर येथे काम केले आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नांदेड, ठाणे, नवी मुंबई, सातारा, पुणे याठिकाणी काम केले आहे. कोल्हापूर कार्यालयात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी असिस्टंट आरटीओ प्रसाद गाजरे, मोटार वाहन निरीक्षक असिफ मुल्लानी, डॉ. स्टीवन अल्वारिस उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More