शिवशाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय माळी

0 208

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : श्री. शिवशाहू शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय माळी तर व्हाइस चेअरमनपदी काशिनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी एफ.डी जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

या निवडीनंतर जमादार यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन संजय माळी म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये आपली पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. इथून पुढे देखील सर्वांच्या सहकार्याने पत संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी करण्याचा आपला प्रयत्न राहील. यावेळी संस्थेचे सर्व संचालक,सचिव व कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More