विरोधी पक्षांकडून संसद भवन परिसरात निदर्शने…

0 13

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा, कर्नाटकच्या बदलत्या राजकीय घडामोडीवरुन आज (गुरुवार) दिल्ली संसद भवन परिसरात विरोधी पक्ष नेत्यांकडून निदर्शने करण्यात आले.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

गोवा, कर्नाटक राज्यात चाललेल्या सत्तासंघर्षा विरोधात  काँग्रेसह तृणमुल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, सीपीआय या पक्षांच्या खासदारांनी  निदर्शने केली. या आंदोलनात सोनिया गांधी, राहुल गांधीसह अन्य खासदार सहभागी झाले होते. यावेळी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘लोकतंत्र बचाव ’ अशा  जोरदार घोषणा देण्यात आल्या.

कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरु असताना गोव्यातही राजकीय नाट्य घडले. यामध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांनी गोव्याच्या विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन भाजपामध्ये विलिन होत असल्याचे पत्र दिले. विरोधीपक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही घडामोड घडली.

तत्पूर्वी कर्नाटकात गेल्या शुक्रवारी राजकीय भुकंप झाला होता. कर्नाटकच्या काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. मात्र, त्यांचे राजीनामे अद्याप स्विकारण्यात आलेले नाहीत. आपले सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More