विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार १९ सप्टेंबरला ?

0 538

 

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा १९ सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. आयोगाच्यावतीने मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याबाबतचा आढावा घेतला जाईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशीलचंद्र आज (मंगळवार) मुंबईत येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल. तर झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More