लेफ्टनंट जनरल फैझ अहमद ‘आयएसआय’चे महासंचालक…

0 8

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) :  पाकिस्तानी लष्कराने लेफ्टनंट जनरल फैझ अहमद यांची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली. विद्यमान आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना केवळ आठ महिन्यांतच या पदावरून हटवण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्कराने १२ एप्रिल रोजी मेजर जनरल हमीद यांना लेफ्टनंट जनरल पदी पदोन्नती देताना त्यांची लष्करी मुख्यालयात अँडज्युटंड जनरल म्हणून नियुक्ती केली होती. फैझ हमीद यांनी यापूर्वी आयएसआयचे अंतर्गत प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांचे हमीद हे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, लेफ्टनंट जनरल मुनीर यांची कॉर्पल कमांडर गुजरानवाला म्हणून नियुक्ती झाली आहे.



Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More