रामजन्मभूमीप्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी : सर्वोच्च न्यायालयाला पक्षकाराची विनंती

0 15

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमीप्रकरणी तातडीने सुनावणी घेऊन प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे अशी मागणी या खटल्यातील एक पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने या मागणीसंदर्भात अर्ज दाखल करण्याचे निर्देश पक्षकारांना दिले आहेत.

या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या मध्यस्थांकडून पहिल्या फेरीत काहीही साध्य झालेले नाही. तसेच मध्यस्थांनी कोणताही तोडगा काढला नसून ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत, त्यामुळे आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी विशारद यांचे वकील पी. एम. नरसिम्हा यांनी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याकडे केली आहे.

याप्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या अधअयक्षतेखाली तीन सदस्यीय मध्यस्थांची समिती स्थापन केली होती. मात्र, या मध्यस्थांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. तसेच त्यांच्या चर्चेच्या पहिल्या फेरीतून काहीही साध्य झालेले नाही. या मध्यस्थांकडून अद्याप योग्य तोडगा निघालेला नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More