राज्यात ऑगस्टपासून महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम…

0 51

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच सुरु होणार आहे. १७ जुलैला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु, प्र-कुलगुरु, महाविद्यालयांचे प्राचार्य, राज्य निवडणूक आयोग यांची महत्वाची बैठक होणार आहे. ही निवडणूक दोन फेऱ्यांमध्ये होणार असून पहिली फेरी ऑगस्ट तर दुसरी फेरी सप्टेंबरपर्यंत होणार आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि. सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

३० जुलैपर्यंत सर्व विद्यापीठांना आपले वेळापत्रक देण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.  महाविद्यालयाचे प्रतिनिधी, विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनिधी अशा पाच पदांसाठी निवडणूक होणार आहे. पहिल्या फेरीत महाविद्यालयीन स्तरावर प्रतिनिधीची निवडून होईल तर, दुसऱ्या फेरीत त्या त्या महाविद्यालयांमधून निवडून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनिधी या चार पदांसाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More