राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस भरती जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

0 69

मुंबई (प्रतिनिधी) : पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांचे लक्ष लागून असलेली पोलीस भरती जाहीर झाली आहे. गृहविभागाने भरती प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या बदलानंतर महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे. ३ सप्टेंबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २३ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यातील आयुक्तालय पोलीस परिक्षेत्रात ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.  

भरती प्रक्रियेत  मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी मैदान चाचणी पहिल्यांदा घेऊन मग उमेदवाराला लेखी परीक्षेला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता सुरुवातीला लेखी परीक्षा होणार असून मगच मैदानी चाचणी होणार आहेत. लेखी परीक्षेच्या स्वरुपात कोणताही बदल नसून प्रत्येक उमेदवाराला ९० मिनिटांच्या १०० गुणांच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. लेखी परीक्षा पूर्वी प्रमाणेच सामान्यज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयावर घेतली जाणार आहे. या परीक्षेत उमेदवारांना किमान ३५ गुण मिळवावे लागणार आहेत.

लेखी परीक्षा ५० गुणांची असेल.  मुलांसाठी ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे आणि १० गुणांसाठी गोळाफेक असे स्वरूप आहे. तर मुलींसाठी ३० गुणांसाठी ८०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे आणि १० गुणांसाठी गोळाफेक असे स्वरूप असेल.

राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि भारत राखीव बटालियन (आयआरबी) या पदांसाठी १०० गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे. या दोन्ही गटासाठी ५ किलोमीटर धावणे, १०० मीटर धावणे याचा समावेश आहे. लेखी परीक्षा १०० आणि मैदानी चाचणी १०० अशी एकूण २०० गुणांची चाचणी असेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More