रयत अॅग्रोची ‘ईडी’ मार्फत चौकशी व्हावी : कडकनाथ कुक्कुटपालन व्यावसायिक

0 357

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कडकनाथ कुक्कुटपालन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रयत अॅग्रो कंपनीची ईडी मार्फत चौकशी व्हावी. शेतकऱ्यांना गुंतवलेल्या पैशाचा परतावा मिळावा, आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन गडहिंग्लजमधील कडकनाथ कुक्कुटपालन शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाला मोर्चा नेऊन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागातील शेतकऱ्यांना कडकनाथ कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्यासाठी विविध आमिषे दाखवून शेतकऱ्यांची रयत अग्रो कंपनीने करोडो रुपयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील कडकनाथ कुक्कुटपालन करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत असून कर्जबाजारी झाला आहे. अनेक युवकांनी मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी असलेली नोकरी सोडून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. ते युवक आता बेरोजगार झाले आहेत.

तर अनेकांनी आपली प्रॉपर्टी विकून कडकनाथ कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. ते शेतकरी देशोधडीस लागले आहेत. तेव्हा गडहिंग्लज विभागातील  कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत अॅग्रो  कंपनीची ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

यावेळी बाळेश नाईक, अमर चव्हाण, राजेंद्र गड्यानावर, दिग्विजय कुराडे, यांच्यासह कुक्कुटपालन करणारे शेतकरी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More