रणवीर सिंहची चाहत्यांसाठी खास भेट…

0 13

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता रणवीर सिंहचा आज (शनिवार) वाढदिवस आहे. या दिवशी त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. रणवीरनं त्याच्या ‘८३’ या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रणवीरणं शेअर केलेल्या या फोटोत तो हुबेहुब कपिल देवसारखा दिसत आहे.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

रणवीरचा हा लुक पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे. त्याच्या या फोटोवर लाइक्सचा पाऊस पडत असून या चित्रपटाबद्दल चाहत्यामंध्ये उत्सुकता निर्माण झाली.

८३’ हा सिनेमा भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित बायॉपिक आहे. १९८३ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या विजयाचा तो प्रमुख शिलेदार होता. या सिनेमात कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. तसेच या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोणही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून, हा सिनेमा १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More