मेकअपपूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी…

0 38

पावसाला आणि थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि शुष्क बनते. त्यामुळे या दिवसात मेकअप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. अन्यथा लगेचच चेहऱ्यावर विपरित परिणाम दिसू लागतात. तसेच चेहरा विद्रूप दिसू लागतो. यासाठी मेकअप करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणती करून नये याविषयी अधिक जाणून घेवू या…

दिवसा बाहेर पडणार असाल तर चेहऱ्यावर अतिशय हलका मेकअप करा. मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असणं गरजेचं आहे, त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होणारा फेसवॉश किंवा क्लीनजरनं चेहरा स्वच्छ करून घ्या. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तो व्यवस्थित कोरडा केल्यावरच मेकअप वापर करावे.

मेकअप साहित्याची अलर्जी होवू नये यासाठी कंपन्यांचं मेकअप वापरा. संध्याकाळी बाहेर पडणार असाल तर तापमान कमी होऊन गारठा वाढणार ही गोष्ट लक्षात घ्या. या वातावरणातही त्वचेचा ओलसरपणा आणि तैलवृत्ती कायम राहण्यासाठी मॉस्च्युरायझरचा वापर करा. त्वचा खूपच ऑईली असेल तर जेल प्रॉडक्टस् वापरा. फर्स्ट एड ब्यूटी स्कीन रेस्क्यू मॅटिफाइंग जेल तुमच्या उपयोगी पडू शकतं. तुमची त्वचा खूपच शुष्क किंवा कोरडी असेल तर स्कीन हायड्रेटिंग बामचा वापर करा. या दोन्ही स्थितीत मेकअर सुरू करण्यापूर्वी त्वचेवर ते व्यवस्थित पसरलं आहे ना, याची खातरजमा करुन घ्यावी.

त्वचेनुसार योग्य खबरदारी घेऊन मेकअप केला तर तुम्ही निर्धास्त होऊन बाहेर पडू शकता. तुमच्या त्वचेनुसार प्रायमर आणि लोशन यांचा वापर करा. डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर ती झाकण्याच्या नादात डोळ्यांभोवती मेकअपचा फार थर चढवू नका. डोळ्यांभोवतीची त्वचा फारच नाजूक असते. त्यामुळे तिला इन्फेक्शन झाल्यास ते डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं. मेकअप करताना फाउंडेशमध्ये फेस ऑइल किंवा बदाम तेलाचे दोन-चार थेंब टाकून ते त्वचेला लावून पहा. वेगवेगळी प्रॉडक्ट वापरून तुमच्या त्वचेला काय सूट होते त्यानुसार प्रॉडक्ट वापर करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More